Ad will apear here
Next
पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रयत्नांना यश
बीड : बीड शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पूल नुकत्याच झालेल्या पावसामुळे खचला होता. यामुळे या महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांनी पुलाच्या चौपदरीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते. 

त्यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांना आता यश आले असून, केंद्र सरकारने पुलाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश आयआरबी कंपनीला दिले आहेत.

ज्या वेळी हा पूल खचून वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती, त्या वेळी डॉ. प्रीतम मुंडे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला बोलावून रस्त्याची दुरुस्ती करायला लावली व वाहतूक पूर्वपदावर आणली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. एवढेच नव्हे, तर पुलाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेशच दिल्लीमधून काढले. हे काम त्यांनी केल्याबद्दल शहरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZQOBE
Similar Posts
पंकजा मुंडे यांच्या हस्ते खेळपट्टीचे लोकार्पण परळी   (बीड) : येथील रेवली परिसरातील रणजी क्रिकेटपटू भूषण भीमा नावंदे यांनी ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंसाठी खेळपट्टी (पिच) तयार केली आहे, खेळपट्टीचे लोकार्पण एक जुलै रोजी पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले.  या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘भारताची आणि मुंबईची सलामीवीर स्मृती मंथाना सध्या
पवारवाडी येथील स्वच्छतागृहांचे लोकार्पण माजलगाव (बीड) : येथील देवकृपा ग्रुपचे अध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी स्वखर्चातून उभारलेल्या पवारवाडी येथील ३० स्वच्छतागृहांचे लोकार्पण रविवारी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी गावकऱ्यांना या स्वच्छतागृहांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. त्या पंकजा मुंडे म्हणाल्या,
‘दरवाजा बंद, तर आजारपण बंद’ बीड : ‘दरवाजा बंद, तर आजारपण बंद’ या पत्रकाचे प्रकाशन नुकतेच बीड जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. ‘दरवाजा बंद’ म्हणजे शौचालयाचा नियमित वापर करणे. यासाठी बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत नवीन शौचालयांचे बांधकाम व शौचालयाचा नियमित वापर करण्याबद्दलच्या जनजागृतीवर भर दिला जात आहे. जिल्ह्याच्या हागणदारीमुक्तीसाठी अतिशय वेगाने काम सुरू आहे
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातर्फे गळीत हंगामासाठी धनादेश वाटप परळी वैजनाथ (बीड) : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याशी करार केलेले ऊसतोड कामगार, वाहतूक ठेकेदार यांना २८ जून रोजी एका कार्यक्रमात गळीत हंगाम २०१७-१८साठी पहिल्या हप्त्याचे धनादेश वाटप करण्यात आले. ‘या वर्षीच्या गळीत हंगामात वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पाच लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार आहे. यासाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language